Mahasamrat Baliraja Website | Home Page


सिंधू (शिव) संस्कृतीचे रक्षक, महानायक, शिवभक्त

एकता राष्ट्र कि शक्ती है | कही हम भूल न जाए | भारत माता कि जय । गर्व से कहो हम भारतीय है

Baliraja Rath Yatra

About Mahasamrat Baliraja

'समस्त भारतीयांचा कुळस्वामी: महासम्राट बळीराजा'


बळीराजा फक्त कृषी/शेतकरी नव्हे तर व्यापार, तंत्रज्ञान, विज्ञान, युद्धनीती, संस्कृती समृद्ध करणारा सर्वांचा, आताच्या समस्त जातींचा, समस्त भारतीयांचा कुळस्वामी, महानायक, रक्षक, समतावादी, संविभागी प्रजाहितदक्ष, न्यायी, स्वामी तिन्ही जगाचा, महादानशूर, महाबली, अलिखित संविधान देणारा पहिला महासम्राट. "माझी प्रजा उपाशी राहू नये, अन्नदाता सुखी भव:, इडापिडा टळो" म्हणुन सतत काळजी घेणारा जीवलग, इतका जीवलग की सात काळजाच्या आत कायम जपून ठेवावा. म्हणुनच "इडापिडा टळो, बळीराज्य येवो" म्हणुन सुमारे 3000 वर्षापासुन समस्त भारतीय त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करीत आहेत. ज्याचे साम्राज्य अफगाणिस्थान पासून इंडोनेशियाच्या बळी (Bali)बेटा पर्यंत (अखंड भारत) होते. एवढे मोठे साम्राज्य सांभाळण्यासाठी विविध खंड/ विभाग करून खंडोबा, ज्योतीबा, म्हसोबा, बिरोबा,भैरोबा, मल्हारी, मार्तंड, काळभैरव, भराडी, थडोबा, विठोबा ईत्यादी मंत्री, अधिकारी होते. आपण त्यांचेही उत्सव करतो. महासम्राट बळीराजा यांचा उत्सव संपूर्ण भारतामध्ये विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. जसे केरळ मध्ये 'ओनम', कर्नाटकामध्ये 'बळीपद्यमी', महाराष्ट्र, मध्यप्रदेश व मध्य भारतात ' बळी दिवाळी, पोळा ',  गुजरात व राजस्थानमध्ये 'वर्ष प्रतिपदा/वसूबारस ', हिमाचल प्रदेशामध्ये 'बलिप्रतिपदा/बरलाज', उत्तर भारतात 'पित्तर ', आसाम मध्ये 'बिहू ' ओडिसा व पूर्वभारतात ' बळी जत्रा', तामिळनाडूमध्ये 'पोंगल' साजरा करून बळीराजाला अभिवादन करतात. आपणही दिवाळी व पोळ्याला आपापल्या घरी व सार्वजनिक ठिकाणी 'बळीपूजन' करून, सांस्कृतिक कार्यक्रम व परिसरात मिरवणूक काढून ' एक दिवा बळीराजासाठी ' लावून अभिवादन, स्मरण करूया, पूर्वजांचा वारसा जपूया, एकमेकांना बळीराजाचे फोटो, प्रतिमा, साहित्य भेट देऊया, राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवूया 

!! आपणास सदैव हार्दिक शुभेच्छा, इडापिडा टळो !!

बळीराजाचे करून पूजन, लावा दीप अंगणी | सुख-समृद्धी येईल घरी, ईडापिडा टळोनी ||

पूर्वजांनी सांभाळला, थापून गोवऱ्या शेण | भाऊबीजेला बहिण करी, त्याची आठवण ||

सिंधू संस्कृतीचा महानायक, भारताचा कुळस्वामी | भारताचा रक्षक तो, करू स्मरण दिवाळी दिनी ||

बळीराजाचे वंशज सारे, अभिमान तो आम्हा | बुद्ध, अशोक, संत सारे, शिवाजी ते भीमा ||

वाटून साहित्य बळीराजाचे, ऋण फेडू त्याचे | समृद्ध त्याची संस्कृती, गोडवे गाऊया तिचे ||

Khandoba Festival
Baliraja Festival

राष्टीय एकात्मतेसाठी सामूहिक बळीराजा उत्सव साजरा करा

हमारा दृष्टिकोण

किसान संस्कृति और ग्रामीण परंपरा को पुनर्जीवित कर समाज में एकता और श्रद्धा का संदेश फैलाना।

हमारा उद्देश्य

बलिराजा के विचारों से प्रेरित होकर सांस्कृतिक कार्यक्रमों और सामाजिक अभियानों के माध्यम से जनजागृती करणे।